Aurangabad | वाळूज एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाण्याची नासाडी | Sakal

2021-11-24 183

जायकवाडी धरणातून वाळूज औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी टाकण्यात आलेली पाईपलाईन रांजणगाव (पान) ते वाळूज रस्त्यावर मंगळवारी (ता.23) दुपारी अचानक फुटल्याने पाण्याचे उंचच उंच व लांबच लांब फवारे उडाल्याने रस्त्यावर मोठी खाच पडली. परिणामी वाहने अडकून पडले व वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान औद्योगिक कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाणी बंद केल्याने वाहतूक सुरू झाली. मात्र तोपर्यंत लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली होती
#jaykvadi #aurangabad #maharastra #sakal

Videos similaires